नांदगाव : तालुक्यातील जातेगावपासून पाच किमी अंतरावर असलेल्या पिनाकेश्वर मंदिरात यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जीर्णोेद्धाराच्या वर्धापननिमित्त हा यात्रोत्सव दरवर्षी भरविला जातो. यंदा ५१ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.
शिखरावर पिनाकेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर सन १९६४ मध्ये हेमाडपंती पद्धतीचे बांधून परिसरातील नागरिकांच्या मदतीने जीर्णोद्धार केला. श्रीक्षेत्र काशी येथून देवीदेवतांच्या मूर्ती आणून चैत्र शु. नवमीस मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून प्रत्येक वर्षी या तिथीस यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते.